सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर मुसलमान जमावाकडून आक्रमण

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथील मंडेबास गावात हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर मुसलमान जमावाने दगडफेक आणि लाठ्या-काठ्या यांद्वारे नुकतेच आक्रमण केले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात सलीम, अलीजान, साजिद, आझम, अयान, आशिक, अहसान, शोएब, चावेज, गुड्डू, फय्याज इत्यादींच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये एका अपंग व्यक्तीचाही समावेश आहे.

या प्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २० जूनच्या रात्री बजरंग दलाचे कार्यकर्ते गावातील मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करत होते. पठण संपवून घरी परततांना आधीच सिद्ध असलेल्या गावातील मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण केले. आझम नावाच्या व्यक्तीने गोळीबार केल्याचाही आरोप आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जीव वाचवून पळ काढला. या आक्रमणात सागर यादव, ह्रतिक यादव आणि युवराज यादव हे गंभीररित्या घायाळ झाले. ‘त्यांनी आम्हाला जिवंत मारण्याचा कट रचला होता, यापूर्वीही त्यांनी आमच्यावर आक्रमण केले होते’, असे सागर यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

असे व्हायला सहारनपूर भारतात आहे कि पाकिस्तानात  ?