‘२४ ते ३०.६.२०२४ या कालावधीत रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’आयोजित करण्यात आला होता. त्याच्या आरंभी, तसेच सद्गुरु आणि मान्यवर मार्गदर्शन करत असतांना पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५५ वर्षे) यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
१. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या आरंभी पुरोहितांनी मंत्रपठण करणे
‘अधिवेशनात उपस्थित सर्वांच्या भोवती पिवळ्या आणि केशरी या रंगांचे मोठे वलय निर्माण होत होते.
२. सद्गुरु सत्यवान कदम (धर्मप्रचारक संत, सनातन संस्था) यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश वाचून दाखवणे
सूत्रसंचालकाने ‘सद्गुरु सत्यवान कदम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश वाचून दाखवतील’, असे सांगितल्यावर ढगाप्रमाणे पांढरे गोळे कार्यक्रमस्थळी सर्वत्र पसरले.
३. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती) यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा उद्देश सांगणे
३ अ. ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या सहस्रारातून केशरी रंगाचा प्रकाश वेगाने त्यांच्या संपूर्ण शरिरात प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
३ आ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यामागे विशाल अशी अनिष्ट शक्ती उभी असणे आणि सद्गुरु पिंगळेकाकांचा आवाज श्रोत्यांपर्यंत पोचत नसणे : सद्गुरु पिंगळेकाका अर्धा विषय सांगेपर्यंत त्यांच्या मागे अनिष्ट शक्ती केवळ उभी होती. त्या वेळी ती काही करू शकत नव्हती; पण तिचे अस्तित्व जाणवत होते. तिची उंची सभागृहाच्या छतापर्यंत होती. त्यामुळे सद्गुरु काकांचा आवाज श्रोत्यांपर्यंत पोचत नव्हता. त्यांच्या आवाजात दाब जाणवत होता. अनिष्ट शक्ती ‘सद्गुरु काकांची वाणी सर्वत्र पोचू नये’, यासाठी प्रयत्न करत होती. ती शक्ती तेथून जात नव्हती. तेव्हा एक प्रकारे सूक्ष्मातील युद्धच चालू होते.
३ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सूक्ष्मातून सद्गुरु पिंगळेकाकांच्या मागे उभ्या रहाणे, अनिष्ट शक्ती नाहीशी होणे अन् ‘सद्गुरु पिंगळेकाकांचा प्रत्येक शब्द सर्वांच्या हृदयापर्यंत पोचत आहे’, असे जाणवणे : त्यानंतर तेथे सूक्ष्मातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आल्या. त्या सद्गुरु काकांच्या मागे उभ्या राहिल्यावर ती अनिष्ट शक्ती नाहीशी झाली. त्यानंतर सद्गुरु काकांच्या आज्ञाचक्रातून प्रकाश प्रक्षेपित होऊ लागला. ‘त्यांच्या वाणीतून येणारा प्रत्येक शब्द प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ ऐकत आहे. उपस्थित असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी व्यक्तीच्या हृदयापर्यंत ‘श्री गुरूंना काय सांगायचे आहे ?’, ते महोत्सवाच्या माध्यमातून सर्वत्र पोचले’, असे मला वाटले.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चैतन्यमय उपस्थितीमुळे झालेला लाभ
४ अ. व्यासपिठाच्या बाजूने प्रकाश येऊन त्याने पूर्ण व्यासपीठ व्यापणे : महोत्सवातील सकाळचे सत्र चालू झाल्यावर मला आरंभी व्यासपिठावर मंद प्रकाश दिसत होता. ‘त्यानंतर अकस्मात् ‘हॅलोजन’(मोठ्या प्रकाशाची यंत्रणा) सारखा पिवळा प्रकाश बाजूने येत आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर पिवळ्या प्रकाशाचे रूपांतर पांढर्या प्रकाशात झाले आणि पूर्ण व्यासपीठ पांढर्या प्रकाशाने व्यापून गेले. ‘तो प्रकाश व्यासपिठाच्या डाव्या बाजूने येत आहे’, असे मला दिसले.
४ आ. ‘संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य पोहोचावे’, यासाठी भगवंत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आज्ञाचक्रातून प्रकाश प्रक्षेपित करत आहे’, असे जाणवणे : माझ्या मनात ‘तो प्रकाश कुठून येत आहे ?’, असा विचार आल्यावर ‘कदाचित् तो प्रकाश श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ बसल्या आहेत, तेथून येत असेल आणि गुरुदेव त्यांच्या माध्यमातून चैतन्याचे प्रक्षेपण करत असतील’, असे मला वाटले; पण मी पुष्कळ दूर पाठीमागे बसले होते; म्हणून मला ‘प्रकाश कुठून येत आहे ?’, हे पहाता येत नव्हते. त्या सत्रात पुष्कळ वेळ असा प्रकाश येत होता. नंतर महाप्रसादाची वेळ झाली.
त्या वेळी मी उठून पाहिल्यावर मला दिसले, ‘व्यासपिठाच्या डाव्या बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बसल्या आहेत आणि त्यांच्या आज्ञाचक्रातून तो प्रकाश प्रक्षेपित होत आहे.’ ‘भगवंत श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून व्यासपिठाचे रक्षण करत आहे. ‘संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य पोचावे’, यासाठी भगवंताचे हे नियोजन आहे’, हे पाहून मला कृतज्ञता वाटली.
५. सद्गुरु नंदकुमार जाधव (धर्मप्रचारक संत, सनातन संस्था) यांनी ‘सनातन संस्थेचा २५ वर्षांचा आध्यात्मिक प्रवास’ याविषयी सांगणे
अ. ‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या आज्ञाचक्रातून मोठ्या प्रमाणात प्रकाश प्रक्षेपित होत होता आणि उपस्थित असलेल्या सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या शरिरामध्ये दैवी कणांचा संचय होत होता. तेथे पुष्कळ दैवी कण चमकत होते.
आ. ‘प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) सद्गुरु जाधवकाकांच्या मागे उभे आहेत’, असे मला दिसत होते.
इ. सद्गुरु काका बोलत असतांना सूक्ष्मातून गुरुदेव कुतूहलाने प्रेक्षकांकडे पहात होते. ते अधून मधून ‘पी.पी.टी.’ योग्य आहे का ?’, ते पहात होते. त्या वेळी सद्गुरु काकांकडून ढगाप्रमाणे मोठ्या प्रमाणात पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत होता.’ (पी.पी.टी. – हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवण्यात येतात.)
५. सद्गुरु नीलेश सिंगबाळ ‘साधना’ या विषयावर मार्गदर्शन करत असतांना जाणवलेली सूत्रे
अ. ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या सहस्रारचक्रावर पुष्कळ मोठ्या प्रमाणात आणि वेगाने केशरी रंगाच्या प्रकाशाचा वर्षाव होत होता, तसेच त्यांच्या आज्ञाचक्रातून पांढर्या रंगाच्या प्रकाशाचे किरण बाहेर पडत होते.
आ. त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला महर्षि स्थानापन्न होते.
इ. सभागृहातील वातावरण शांत आणि स्थिर होते. सर्व जण स्थिर होते.
ई. सद्गुरु नीलेशदादांच्या प्रत्येक शब्दामध्ये सामर्थ्य, निर्भयता, भाव आणि चैतन्य जाणवत होते. त्यांच्या बोलण्याने उपस्थित प्रत्येकाचे चारही देह (स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे देह) भेदले जाऊन त्यांच्या अंतर्मनापर्यंत विषय पोचत होता. त्यामुळे सर्वांमध्ये अंतर्मुखता निर्माण झाली.
उ. सद्गुरु नीलेशदादांनी ‘देवतांचा नामजप कसा करावा ?’ (उदा. ‘श्री भवानीदैव्ये नम: ।’ ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’), याविषयी सांगितल्यावर सर्वांच्या भोवती पांढरे वलय निर्माण झाले. सद्गुरु दादांनी जेवढा वेळ नामजपाचा उच्चार केला, तेवढा वेळ एक प्रकाशमान वलय निर्माण झाले होते.’
– (पू.) सौ. संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५५ वर्षे) (२८.७.२०२४)
देहली येथील अधिवक्ता विष्णु शंकर जैन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे मार्गदर्शनअ. ‘अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी मला काशी विश्वनाथाचे दर्शन होत होते. त्यांच्या अनेक अवयवांच्या ठिकाणी देवतांचे अस्तित्व कार्यरत होते, उदा. छाती आणि हात या अवयवांच्या ठिकाणी एकेक चांदणी चमकत होती आणि त्या चांदणीत मला सूक्ष्मातिसूक्ष्म देवतेचे दर्शन झाले. आ. त्यांच्या शरिरातून पांढरे गोळे बाहेर पडत होते. ते गोळे लहान ढगांप्रमाणे वातावरणात विरून जात होते आणि हिंदु धर्माभिमान्यांमध्ये जागृती निर्माण करत होते. इ. त्यांच्या वाणीतून सरस्वतीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत होते आणि त्याची स्पंदने प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचत होती. ई. त्यांना देवता आणि ऋषिमुनी आशीर्वाद देत होते. एका देवतेने आनंदित होऊन कौतुकाने अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या डोक्यावर देवांप्रमाणे मुकुट घातला.’ – (पू.) सौ. संगीता जाधव |
|