‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’च्या तिसर्‍या दिवशी वक्त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे सूक्ष्म परीक्षण

‘१८.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वक्त्यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी देवाने आमच्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.  

१. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधिज्ञ परिषद.

अ. अधिवक्ता इचलकरंजीकर यांच्यात क्षात्रवृत्ती, त्याग, समर्पण आणि तळमळ आहे. ते विविध सेवा करतांना सेवेशी पूर्णत: एकरूप होतात. त्यामुळे त्यांना काहीही विचार न करता, तसेच न्यायालयीन संदर्भ न पहाता सर्व घडामोडींविषयी दिनांकासह सहजतेने आणि अखंड बोलता येते.

आ. त्यांच्यातील सात्त्विक बुद्धीमुळे त्यांना न्यायालयात परिणामकारक युक्तीवाद करता येतो आणि हिंदुत्वविरोधी विचारसरणीला ठामपणे, चिकाटीने आणि क्षात्रभावाने विरोध करता येतो.

इ. त्यांनी पुष्कळ तळमळीने विषय मांडल्यामुळे त्याचा परिणाम श्रोत्यांवर होऊन त्यांना सहजतेने विषयाचे आकलन होत होते.

२. अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, तेलंगाणा

अधिवक्ता उपाध्याय यांच्यात हिंदु धर्माप्रती पुष्कळ निष्ठा आणि क्षात्रभाव आहे.

– श्री. राम होनप, कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१८.६.२०२३)