‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’च्‍या दुसर्‍या दिवसातील पहिल्‍या सत्रातील मान्‍यवरांचे सूक्ष्म परीक्षण

‘१७.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्‍थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त वक्‍त्‍यांनी मार्गदर्शन केले. त्‍या वेळी देवाने आमच्‍याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे. 

श्री. राम होनप

१. श्री. कृष्‍ण देवराय, अराविडू राजवंश, आनेगुंडी नरपति संस्‍थानम्, कर्नाटक

अ. श्री. देवराय मंदिरांच्‍या संदर्भातील कार्य करत असल्‍याने त्‍यांच्‍यावर देवतांची कृपा होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍या काही कौटुंबिक अडचणी सुटण्‍यास साहाय्‍य होते.

आ. त्‍यांच्‍यात नम्रता आणि धर्माभिमान आहे अन् त्‍यांच्‍यात आंतरिक भाव आहे. ते त्‍यांच्‍या विविध कृतींतून व्‍यक्‍त होतो.

२. श्री. महेश डेगला, संस्‍थापक अध्‍यक्ष, हिंदु उपाध्‍याय समिती, आंध्रप्रदेश

अ. श्री. डेगला यांच्‍यात प्रधान गुण क्षात्रवृत्ती आहे. त्‍यामुळे त्‍यांना हिंदूंना जागृत करता येते. यासमवेत त्‍यांच्‍यात नेतृत्‍व, स्‍वीकारण्‍याची वृत्ती, प्रेमभाव आणि इतरांना समजून घेणे, असे अनेक गुण आहेत.

आ. त्‍यांना राष्‍ट्र आणि धर्म कार्य करण्‍याची पुष्‍कळ तळमळ आहे अन् त्‍यांच्‍यात त्‍याग करण्‍याची वृत्ती आहे. त्‍यामुळे ते करत असलेल्‍या प्रयत्नांंना यश मिळते.

श्री. निषाद देशमुख

३. अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर, अधिवक्‍ता संघटक, हिंदु जनजागृती समिती

अधिवक्‍ता सांगोलकर यांना महालक्ष्मीदेवीचा आशीर्वाद आहे. त्‍यामुळे हिंदु धर्माविषयी कार्य करतांना काही विषय ते ईश्‍वरी प्रेरणेने बोलतात.

४. श्री. अनुप जयस्‍वाल, सचिव देवस्‍थान सेवा समिती, विदर्भ, महाराष्‍ट्र्र

अ. श्री. जयस्‍वाल निःस्‍वार्थी वृत्तीचे आहेत. त्‍यांना धर्मकार्य करतांना कुठल्‍याही व्‍यावहारिक अपेक्षा नसतात. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर देवतांची कृपादृष्‍टी आहे.

आ. गुरूंच्‍या आज्ञेने ते व्‍यष्‍टी साधना करतात आणि मंदिरांच्‍या मुक्‍तीसाठी प्रयत्न करण्‍याच्‍या माध्‍यमातून त्‍यांची समष्‍टी साधना होत आहे. ते धर्मकार्य करतांना देवतांचे अस्‍तित्‍व अनुभवतात.

कु. मधुरा भोसले

५. डॉ. एन्. रमेश हासन, सहकार संजीवनी हॉस्‍पिटल, हासन, कर्नाटक

अ. डॉ. हासन यांच्‍यात उत्‍साह, नम्रता, साधकत्‍व, शिकण्‍याची वृत्ती, अंतर्मुखता हे गुण आहेत, तसेच त्‍यांच्‍यात क्षात्रशक्‍ती आहे.

आ. त्‍यांची ‘निरपेक्षभावाने मंदिरांसंबंधी परिपूर्ण ऐतिहासिक संशोधन करणे आणि त्‍या संदर्भात हिंदु समाजाला जागृत करणे’ या माध्‍यमांतून साधना होत आहे.

६. अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय तथा प्रवक्‍ते, हिंदु फ्रंट फॉर जस्‍टिस

अ. अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन यांची साधना आणि कृतज्ञताभाव यांत वाढ होत आहे. परिणामी त्‍यांच्‍या हातून होत असलेल्‍या समष्‍टी कार्यातही वाढ होत आहे. त्‍यामुळे त्‍यांना ‘धर्मात्‍मा’ हे संबोधन आहे.

आ. त्‍यांच्‍यात गुरु आणि देव यांच्‍याप्रती भाव असल्‍याने धर्माच्‍या संदर्भातील कठीण अडचणी ते सक्षमतेने सोडवतात.

इ. त्‍यांच्‍या आध्‍यात्मिक क्षमतेत वाढ होत असल्‍यामुळे त्‍यांच्‍यात अधिवक्‍ता, धर्मरक्षक, हिंदु प्रवक्‍ते, साधक अशा अनेक दायित्‍वांचे वहन करण्‍याची क्षमता निर्माण होत आहे.’

– श्री. राम होनप, कु. मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) आणि श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.६.२०२३)

  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक