देहलीतील एका हिंदु अल्पवयीन मुलीला २० वेळा चाकूने भोसकून आणि दगडांनी ठेचून धर्मांध युवक साहिलने केलेल्या अत्यंत निर्घृण हत्येचा ‘व्हिडिओ’ प्रत्येक संवेदनशील माणसाच्या हृदयाची कालवाकालव करणारा आहेच; पण दुर्दैवाची गोष्ट ही की, देशभरात प्रतिसप्ताह हिंदु मुलींच्या संदर्भात अशा घटना कुठे ना कुठे घडत असतांना सरकार आणि सर्वत्रचे हिंदू अद्याप म्हणावे तेवढे जागृत झालेले नाहीत; ना माध्यमे झाली आहेत, ना पोलीस प्रशासन ! लव्ह जिहादच्या विरोधात महाराष्ट्रात सहस्राेंच्या संख्येने मोर्चे निघाले; ‘द केरल स्टोरी’ सारख्या चित्रपटातून अगदी सामान्यातील सामान्य हिंदूपर्यंत धर्मांध प्रेमाच्या माध्यमातून हिंदु मुलींची फसवणूक करत असल्याचा संदेश गेला. काही हिंदू जागृत आहेत आणि त्यातले काही याविषयी कृतीशीलही आहेत; परंतु अशा घटनांची वारंवारता काही थांबायचे नाव घेत नाही. याचाच अर्थ अजून हिंदूंनी पुष्कळ काम करणे बाकी आहे. कायद्याने लव्ह जिहाद पूर्ण थांबेल, असे नाही; पण त्या माध्यमातून ‘लव्ह जिहादी धर्मांधांना अतीकडक शिक्षा होणे’, हा या घटना रोखण्यातील महत्त्वाचा भाग ठरू शकतो. ‘सध्या ९ राज्यांत अस्तित्वात असलेला धर्मांतरविरोधी कायदा त्यासाठी पुरेसा नाहीच’, हे कुणाच्याही सहज लक्षात येईल. लव्ह जिहादमध्ये शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, लैंगिक अशा अनेक स्तरांवर शोषण होते आणि हत्येसारख्या घटनाही घडतात. तिथे प्रत्यक्ष धर्मांतर होतही नाही. तसेच येथे केवळ हत्या किंवा केवळ पॉक्सो यांविषयीचे कायदेही पुरेसे वाटत नाहीत. त्यामुळे देशपातळीवर अत्यंत तातडीने प्रामुख्याने लव्ह जिहाद्यांच्या विरोधातील कायदा पारित करणे आवश्यक आहे. जसे कायदा होऊनही अद्यापही गोहत्या होतच आहेत, तसे यासाठी केवळ कायदा पुरेसा नसून हिंदूंमधील खोल आणि व्यापक जागृतीही आवश्यक आहे.
जोपर्यंत बहुसंख्य हिंदु मुलींना धर्माचे शिक्षण देऊन त्यांच्या मनात स्वधर्माविषयी प्रखर अभिमान निर्माण करत नाही आणि जोपर्यंत त्यांना स्वसंरक्षणासाठी शारीरिक प्रशिक्षण देत नाही, तोपर्यंत हिंदूंच्या मुली या धर्मांधांच्या बळी ठरतच रहाणार. काळानुसार एकंदरच हिंदु समाजाची नैतिकता अधःपतीत झाली असल्याने शीलरक्षण आणि त्या संबंधित नीतीमूल्ये यांचे आज काही वाटेनासे झाले आहे. त्यातून देहलीसारख्या शहरात त्याविषयी काय धारणा असणार ? नीतीमूल्यांचे महत्त्व धर्माचरणी किंवा साधना करणारेच चांगल्या प्रकारे जोपासू शकतात. ‘हिंदूंच्या घरोघरी आणि शाळांमध्ये धर्माचरण शिकवले गेले पाहिजे’, हाच त्यावरील अंतिम उपाय आहे. हा पालट अल्पावधीत होऊ शकत नाही; परंतु याला कुठेतरी आरंभही झाला पाहिजे. हिंदूंच्या वस्त्यावस्त्यांमध्ये मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे वर्ग चालू झाले पाहिजेत, तरच मुलींमधील जागरूकता वाढेल. हिंदु कितीही शिकला; परंतु त्याला धर्मशिक्षण आणि धर्माभिमान नसेल, तर त्याचा काहीही उपयोग नाही. जोपर्यंत त्याच्यात क्षात्रतेज जागृत होत नाही, तोपर्यंत तो स्वतःचे रक्षण करू शकत नाही. आतापर्यंतच्या लव्ह जिहादमधील हत्यांच्या घटना पहाता ‘येणार्या काळात हिंदूंच्या मुलींना पोलीस वाचवू शकत नाहीत’, हे हिंदूंनी पक्के ध्यानात घेतले पाहिजे आणि त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी बाध्य केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक हिंदु कुटुंबाने आधी स्वतः जागृत झाले पाहिजे.
प्रसारमाध्यमांच्या मानगुटीवर सर्वधर्मसमभावाचे भूत !
निर्भया प्रकरणातील ज्या धर्मांध अल्पवयीन आरोपीने सर्वांत क्रूर कृत्य केले होते, तो आज मोकाट आहे आणि त्याला व्यवसायही चालू करून दिल्याचे ऐकिवात आहे. अशामुळे अल्पवयीन धर्मांध तरुणांचा धीर चेपला गेला नाही तरच नवल ! ज्याला बलात्कार करायचा कळतो, त्याला अल्पवयीन म्हणणे तरी उचित होईल का ? त्यामुळे आता ‘अल्पवयीन’साठी ठरवलेली वयाची मर्यादाही पालटणे आवश्यक आहे’, असेच वाटते. हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या आरोपी धर्मांध जिहाद्यांना फाशी होत नाही, तोपर्यंत लव्ह जिहाद्यांवर वचक बसणार नाही; परंतु एरव्ही मिडिया ट्रायल घेणारी प्रसारमाध्यमे कुणाच्या तरी दबावाखाली ‘लव्ह जिहाद’ शब्द वापरण्यास आणि मुलगी ‘हिंदु’ आहे, हे सांगण्यास कुचराई करतात, तर हिंदु समाज अन् हिंदु कुटुंबे यांत जागृती कशी निर्माण होणार ? ‘आजही हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच प्रसारमाध्यमांनी देहली येथील घटनेतील मुलगी हिंदु आणि मुलगा धर्मांध असल्याचे अधोरेखित केले आहे’, यापेक्षा हिंदूंचे दुर्दैव दुसरे कुठलेच नाही. हिंदूंची प्रसारमाध्यमेच त्यांच्यावरील ‘हिंदु’ म्हणून झालेल्या अन्यायाला वाचा फोडत नाहीत, तिथे पैसे कमावण्यात व्यस्त झालेला हिंदु समाज काय जागृत होणार ? एकतर्फी समभावाने, म्हणजेच ‘सर्वधर्मसमभावा’ने रहाण्याची जी अत्यंत घृणास्पद शिकवण त्याला देण्यात आली आहे, त्याचेच प्रसारमाध्यमे हेही एक फलित आहे. हिंदूंवरील अन्यायाला वाचा न फोडणार्या या सर्व प्रसारमाध्यमांची येणार्या काळातील इतिहासात ‘हिंदुद्वेषी माध्यमे’ म्हणून नोंद झाल्यास आश्चर्य नव्हे.
अहिंसेचा शाप !
देहलीतील कालच्या घटनेत संपूर्ण कालावधीत ७-८ जण तिथून जा-ये करत होते. त्या सर्वांनी मिळून या धर्मांधाला पकडले असते, तर कदाचित् या मुलीचा जीव वाचूही शकला असता आणि फारतर एखाद-दुसरा हिंदु घायाळ झाला असता; परंतु दुर्दैवाने हिंदूंची प्रतिकार करण्याची वृत्तीच पूर्णतः लयाला गेली आहे. याचे मूळ मोहनदास गांधींनी या समाजाला दिलेल्या अहिंसावादात आहे. हिंदु समाजाला शाप ठरलेल्या या अहिंसावादाने हिंदूंमधील प्रतिकारक्षमता नष्ट करून त्याला षंढ बनवले आहे. त्याला जन्महिंदु बनवले आहे. स्वअस्तित्वाच्या लढाईची वेळ आली, तरी तो स्वतःचे रक्षण करत नाही. धर्मांधांना बळी पडणार्या हिंदु मुली या निम्न, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू अशा सर्व स्तरांतील आहेत. त्यामुळे आता सर्व स्तरांतील हिंदूंनी एकत्र येऊन धर्मांधांच्या या वंशविच्छेदाच्या षड्यंत्राच्या विरोधात दंड थोपटले पाहिजेत !!
हिंदु मुलींच्या निर्घृण हत्या थांबवण्यासाठी आता हिंदूंनीच दंड थोपटले पाहिजेत |