दारव्हा (यवतमाळ) येथे अमली पदार्थ पकडले !

( संग्रहीत छायाचित्र )

दारव्हा (यवतमाळ), २१ मे (वार्ता.) – तालुक्यातील मानकोपरा या गावातून गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ३ तस्करांना १४१ ग्रॅम ‘मेफड्रॉन’ या अमली पदार्थासमवेत अटक करण्यात आली. जिल्ह्यात यापूर्वी यवतमाळ येथे १९ ग्रॅम आणि पांढरकवडा पोलिसांनी यवतमाळ बसस्थानकावर १० ग्रॅम मेफड्रॉन पकडले होते. मेफड्रॉन पावडर नशा करण्यासाठी वापरली जाते. पकडण्यात आलेल्या या पावडरची बाजारातील किंमत ११ लाख ३२ सहस्र ८०० रुपये इतकी आहे.