मुंबई – सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिटच्या अंतर्गत महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. यासाठी ३८.९३ हेक्टर जागा सातारा जिल्हा पोलीस दलाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रात ‘आपत्तीमध्ये नागरिकांना वाचवण्याचे कार्य कसे करावे ?’ याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली.