|
छत्रपती संभाजीनगर – पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणार्या टोळीचा भांडाफोड केला आहे. (पुणे पोलिसांंना जी माहिती मिळते, ती छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांना न मिळणे त्यांना लज्जास्पद ! – संपादक) ही टोळी इयत्ता १० वी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चक्क उत्तीर्ण असल्याच्या प्रमाणपत्रांचे वाटप करत होती. यासाठी ‘महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल’ हे बनावट संकेतस्थळही सिद्ध करण्यात आले होते.
Fake Educational Certificate Scam : नापासांना केलं पास,दहावी-बारावीची बनावट सर्टिफिकेट केली तयार; बोर्डाची खोटी वेबसाईटही बनवली https://t.co/0xN8WPFSYj #Sarkarnamanews #Marathinews #Maharashtrapolitics #Politicalnews #Marathipoliticalnews
— Sarkarnama (@SarkarnamaNews) May 9, 2023
त्याद्वारे या टोळीने ७०० जणांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कृष्णा गिरी, अल्ताफ शेख आणि सय्यद इमरान सय्यद इब्राहिम यांना अटक केली आहे. हा घोटाळा ‘टीईटी’नंतरचा (शिक्षक भरती घोटाळ्यानंतरचा) राज्यातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. (शैक्षणिक क्षेत्रातील घोटाळे रोखता न येणे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)
आरोपी गिरी हा जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील कृष्णापूर येथे रहातो. काही दिवसांपूर्वी त्याने ‘महाराष्ट्र पब्लिक स्कूल’ नावाने एक संस्था चालू केली. या संस्थेद्वारे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तो उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देत होता. बिडकीनपासून काही अंतरावर असलेल्या चितेगावमध्ये त्याने यासाठी एक कार्यालयही चालू केले होते. या प्रकरणातील दुसरा आरोपी सय्यद इमरान हा येथीलच आहे.
संपादकीय भूमिका७०० जणांना बनावट प्रमाणपत्र देईपर्यंत याचा सुगावा न लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडे कुठली व्यवस्था आहे का ? |