जुन्नर (पुणे) येथील लोक न्यायालयामध्ये ७ कोटी रुपयांची तडजोड वसूल !


जुन्नर (पुणे)
– येथील न्यायालयातील एकूण २१ सहस्र ३८६ प्रकरणांपैकी ११ सहस्र ९११ प्रकरणे प्रविष्ट होती. त्यापैकी न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १० सहस्र ८८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून ६ कोटी ९३ लाख ७१ सहस्र २६३ रुपयांची तडजोड वसूल झाली. जुन्नरमध्ये मुख्य न्यायाधीश प्रताप सपकाळ आणि सह दिवाणी न्यायाधीश प्रचेता राठोड, तसेच जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष, सदस्य अन् पत्रकार उपस्थित होते.

या अदालतींमध्ये दिवाणी दावे, अदखलपात्र फौजदारी गुन्ह्यांची प्रकरणे, पोटगी अथवा कौटुंबिक हिंसाचार, बँका, पतसंस्था यांची थकबाकी, तसेच नगरपालिका, विद्युत् विभाग, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांची कर थकबाकी प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली.