श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पू. सत्यनारायण तिवारी यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

सन्मान सोहळ्याच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. तिवारीकाका यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या आंतरिक साधनेचे रहस्य जाणून घेतले. तेव्हा त्यांना पू. तिवारीकाका यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. सत्यनारायण तिवारी

१. प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्यासी जोडा ।’, हे वचन आचरणात आणणारे पू. तिवारीकाका !

‘पू. तिवारीकाका गेल्या २ वर्षांपासून तीव्र शारीरिक त्रासांमुळे रुग्णाईत आहेत. त्यांना सतत झोपून रहावे लागते, तसेच त्यांना मेंदूच्या आजारामुळे विस्मृतीही होते. त्यांची अशी स्थिती असूनही ते म्हणतात, ‘‘मी पुष्कळ चांगला आहे.’’ यातूनच त्यांची उच्च आध्यात्मिक स्थिती लक्षात येते. प.पू. भक्तराज महाराज यांचे वचन आहे, ‘देह प्रारब्धावर सोडा, चित्त चैतन्यासी जोडा ।’ पू. काकांचे जीवन असेच आहे. पू. काका सतत देवाच्या अनुसंधानात असल्याने ते त्यांचे तीव्र प्रारब्ध आनंदाने भोगत आहेत. पू. काकांच्या उदाहरणातून साधना करण्याचे महत्त्व आपल्या लक्षात येते.

२. पू. काकांचे सर्व विचार भगवंताशी जोडलेले आहेत. त्यांची शारीरिक स्थिती खालावत चालली आहे; मात्र त्यांचे मन अखंड देवाच्या अनुसंधानात आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

३. पू. तिवारीकाकांची अंतर्मुख स्थिती !

पू. काकांना कुणाचा सत्संग मिळाला, त्यांना कुणाचे मार्गदर्शन मिळाले, कुणी त्यांच्या साधनेचा आढावा घेतला, असे झाले नाही; तरीही ते अंतर्मुख आहेत. पूर्वी ते चिडचिड करत असत. त्यांना राग येत असे. असे आपल्याला दिसत असे; पण ‘त्यांची अंतर्मनाची साधना होत होती’, हे आता आपल्या लक्षात आले. केवळ गुरुदेवच प्रत्येक जिवाला ओळखू शकतात. गुरुदेवच प्रत्येक जिवाच्या आंतरिक साधनेची स्थिती जाणतात. त्यामुळे पू. काका साधकांच्या संपर्कात नसले, तरीही अंतर्यामी श्री गुरूंनी त्यांची आंतरिक साधना ओळखून त्यांना संतत्व प्रदान केले.

४. जेव्हा मी पू. काकांना पाहिले, तेव्हा त्यांचे एकूणच वागणे पाहून ते अवलिया संत असल्याप्रमाणे वाटत होते. त्यांना पाहून मला प.पू. भालचंद्र महाराज, शेगावचे श्री गजानन महाराज यांच्यासारख्या संतांचेही स्मरण झाले.

५. संत सन्मान झाल्यानंतर पू. काका काही वेळ हातवारे करत होते. तेव्हा ‘त्यांची ती कृती सहज नसून त्यामागे काहीतरी भावार्थ आहे’, असे मला जाणवत होते.

६. पू. तिवारीकाकांची छायाचित्रे पाहून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती 

६ अ. वर्ष २०१९ मधील पू. काकांचे छायाचित्र पाहून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती 

१. मी पू. काकांचे वर्ष २०१९ मधील छायाचित्र पाहिले. तेव्हा त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यांच्या छायाचित्राकडे पाहून ‘ते भावावस्थेत आहेत’, असे मला जाणवत होते.

२. त्या छायाचित्रातील त्यांच्या डोळ्यांकडे पाहून मला वेगळेच जाणवत होते.

३. त्यांच्याकडे पाहून ‘ते बालकभावात आहेत’, असे मला वाटले.

४. त्यांचे छायाचित्र पाहून माझी भावजागृती झाली.

५. त्यांच्या छायाचित्रातून ‘त्यांच्या मनाची निर्मळता आणि त्यांच्यातील अल्प अहं’, यांची मला जाणीव झाली.

६ आ. वर्ष २०२३ मधील पू. तिवारीकाकांचे छायाचित्र पाहून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती 

६ आ १. ‘पू. काकांची रामकृष्ण परमहंस यांच्याप्रमाणे भावस्थिती आहे’, असे जाणवणे : पू. काकांचे वर्ष २०२३ मधील छायाचित्र पहाण्याचा विचार माझ्या मनात आला. त्याच वेळी मला जाणवले, ‘पू. काकांची रामकृष्ण परमहंस यांच्याप्रमाणे भावस्थिती आहे.’ तेव्हा मला रामकृष्ण परमहंस यांचे स्मरण झाले. ‘रामकृष्ण परमहंस त्यांच्या पत्नीत देवीचे रूप पहात असत. त्याचप्रमाणे ‘पू. काकांना स्वतःची पत्नी शक्तीस्वरूपा आहे’, असे वाटते’, हे आताच्या संवादातून समजले. ‘पू. काका काही मासांपासून ‘परमहंस, परमहंस’ असे म्हणत आहेत. हेही आताच समजले’, यावरून ‘पू. काकांचा विषय आल्यावर मला रामकृष्ण परमहंस यांचे स्मरण का झाले ?’, याचा उलगडा झाला.

६ आ २. पू. काकांचे छायाचित्र पहातांना माझे लक्ष सर्वप्रथम त्यांच्या डोळ्यांकडे गेले. ‘त्यांची दृष्टी शून्यात आहे’, असे मला जाणवले. त्यांच्या डोळ्यांकडे पाहून मीही शून्यावस्था अनुभवली आणि माझे ध्यान लागल्यासारखे झाले.’    

(क्रमशः)

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२३.४.२०२३)

या लेखात  प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार  सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक