समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करणार !

  • कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे घोषणापत्र प्रसिद्ध

  • ३ सणांच्या वेळी दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना विनामूल्य गॅस सिलिंडर आणि प्रतिदिन अर्धा लिटर नंदिनी दूध देणार

घोषणापत्र प्रसिद्ध करताना भाजपचे नेते

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्याचे घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. यात त्याने पुन्हा सत्तेत आल्यास समान नागरी कायदा करण्यासाठी समिती स्थापन करण्यासह युगादी, गणेश चतुर्थी आणि दिवाळी या सणांच्या वेळी विनामूल्य गॅस सिलिंडर, तसेच दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना प्रतिदिन अर्धा लिटर नंदिनी दूध विनामूल्य देण्याचे आश्‍वासन दिले आहे. घोषणापत्र प्रसिद्ध करतांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि अन्य मंत्री आणि नेते उपस्थित होते.

भाजपने या व्यतिरिक्त अन्यही आश्‍वासने दिली आहेत. यात प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात ‘अटल आहार केंद्र’ चालू करण्यात येणार आहे. दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना ५ किलो श्री अण्णा रेशन किट देण्यात येणार आहे.

‘सर्वारिगू सुरू योजने’द्वारे महसूल विभाग बेघरांना राज्यभर १० लाख घरांचे वाटप करणार आहे. शेतकर्‍यांना बियाणांसाठी १० सहस्र रुपये दिले जाणार आहेत. तसेच ५ लाखांवर कर्ज घेतल्यास कोणतेही व्याज घेण्यात येणार नाही.