धार्मिक भावना दुखावण्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही ! – उत्तराखंड उच्च न्यायालय

उत्तराखंड उच्च न्यायालय

डेहराडून (उत्तराखंड) – भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण उत्तरांखड उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. भारतीय दंड संहिता २९५ अ अंतर्गत आरोपीच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याला रहित करण्याची मागणी फेटाळतांना न्यायालयाने हे निरीक्षण मांडले.

न्यायालयाने म्हटले की, भारतात प्रत्येक नागरिकाला अन्य धर्माच्या प्रती सन्मान ठेवणे आवश्यक आहे. जर याचा अभाव असेल आणि अन्य धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्यात येत असतील, तर अशा घटना समाजाला गिळंकृत करतील आणि त्यामुळे अशांतता अन् अकारण शत्रूत्व निर्माण होईल.