पुणे – दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पी.डी.सी.सी.) अंदाजे १०० कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज थकीत आहे. ही थकबाकी भरण्यासाठी कारखान्याला एक रकमी परतावा भरण्याची मुभा दिली होती; मात्र दिलेली मुदत संपूनही हे पैसे भरले गेले नाहीत.
या संदर्भात माहिती घेतली असता तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने रक्कम भरता आली नाही, असे सांगितले आहे; मात्र ही थकबाकी न भरल्यास जिल्हा बँक भीमा पाटस सहकारी कारखान्यावर वसुलीसाठी कारवाई करेल, असे बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.