अडवलपाल (डिचोली) खाण फॉमेंतोला मिळाली
पणजी, २१ एप्रिल (वार्ता.) – गोवा सरकारने खाणींच्या ‘ई-लिलावा’च्या दुसर्या फेरीला २१ एप्रिलपासून प्रारंभ केला आहे. ‘ई-लिलावा’च्या पहिल्या दिवशी अडवलपाल, डिचोली येथील ४६ हेक्टर क्षेत्र लोह खनिज खाण फॉमेंतो आस्थापनाला मिळाली आहे. ‘इंडियन ब्युरो ऑफ माईन्स’च्या सरासरी विक्रीदराच्या ५८.८५ टक्क्यांनी फॉमेंतो आस्थापनाने ही निविदा मिळवली आहे.
Fomento bags Advalpale-Tivim mining block as auction begins https://t.co/kRXnQzSvps
— TOI Goa (@TOIGoaNews) April 21, 2023
डिचोली तालुक्यातील हरवळे, कुडणे आणि सुर्ला, तसेच बार्देश तालुक्यातील केळी या एकूण चार खाण क्षेत्रांचा ‘ई-लिलाव’ २७ एप्रिल या दिवशी होणार आहे. यापूर्वी खाणींच्या ‘ई-लिलाव’च्या पहिल्या फेरीत डिचोली खाण वेदांता, शिरगाव येथील खाण साळगावकर, मोंत दी शिरगाव येथील खाण नाना बांदेकर आणि काले येथील खाण फॉमेंतो यांनी मिळाली होती.