‘धार्मिक विधी सशास्त्र झाल्यास वैवाहिक जीवनात सौख्य आणि संतती या लाभांसह सुदृढ कुलाची अभिवृद्धी होते. यासाठीच ईश्वराने त्या त्या कल्याणकारी मंत्रांची योजना केलेली आहे, म्हणजेच येथे ईश्वराचा संकल्प आहे. कुणीही सोम्या-गोम्याने लग्नविधी निर्माण केलेले नाहीत. त्यामुळेच संपूर्ण मानवजातीला त्याचा लाभ मिळतो. सर्व जण कार्याच्या आरंभी देवतांना नारळ-विडा अर्पण करून मंगलकार्य निर्विघ्नपणे होण्यासाठी प्रार्थना करतात; मात्र कार्य निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर शेवटी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला विसरतात. हे टाळून मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडले; म्हणून शेवटी देवाच्या चरणी कृतज्ञता आवर्जून व्यक्त करा !’
– श्री. दामोदर वझेगुरुजी, संचालक, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, रामनाथी, गोवा.
(संदर्भ – सनातन निर्मित ग्रंथ – विवाहसंस्कार)