सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्याने ‘निरर्थक विचाराध्यास’, हा त्रास न्यून होणे

‘मला ‘निरर्थक विचाराध्यास आणि एखादी कृती करण्याचा अट्टहास करणे’, असे त्रास होतात. त्यासाठी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सांगितल्याप्रमाणे ‘श्री गुरुदेव दत्त । श्री गणेशाय नमः । श्री गणेशाय नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, असा नामजप केला. १९.९.२०२२ या दिवसापासून मी हा जप प्रतिदिन १ ते दीड घंटा बसून करत आहे. हा नामजप केल्यावर मला झालेले लाभ पुढे दिले आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. पूर्वीच्या तुलनेत माझा निरर्थक कृती करण्याचा अट्टाहास ५० टक्के न्यून झाला.

२. पूर्वी माझ्या मनात सहसाधकांविषयी नकारात्मक विचार येत असत. जप केल्यानंतर थोड्याच वेळात माझ्या मनात साधकांविषयी सकारात्मक विचार येण्यास प्रारंभ होतो.

३. पूर्वीच्या तुलनेत ‘निरर्थक विचारध्यास’ ५० टक्के न्यून झाला आहे.

४. संतांच्या प्रत्यक्ष उपायांच्या वेळी जप केल्याने अधिक परिणामकारकता जाणवते.

५. नामजप करतांना माझी एकाग्रता वाढली आहे आणि जपावरील श्रद्धेतही वाढ झाली आहे.’

– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक