रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. हनुमंत सूर्याजी चौगले (तबलावादक), सिरसे, राधानगरी, कोल्हापूर.

अ. ‘मी आश्रमात प्रथमच आलो आहे. मला आश्रमातील सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आला. माझ्यातील नकारात्मक विचार आणि स्पंदने काही प्रमाणात शरिरातून बाहेर पडतांना जाणवली. मला माझ्या पाठीवर आणि कानात कंपने जाणवली.

आ. मी सूक्ष्म जगताविषयी पुष्कळ ऐकून होतो. आतापर्यंत मला याविषयी काही अनुभवही आले आहेत. इथे आल्यानंतर मला सूक्ष्म जगत आणि त्याचे विशाल स्वरूपातील परिणाम प्रत्यक्ष समजले.’

२. कु. विशाल सुर्वे (तबला विशारद), गोवा

अ. ‘मी आश्रमात प्रथमच आलो आहे. येथे आल्यावर मला छान वाटले. येथील परिसर छान आहे. ‘सात्त्विकता म्हणजे काय ?’, हे आज मला अनुभवायला मिळाले.’

(सर्व सूत्रांसाठी दि. २९.१.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार जिज्ञासूंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक