पाकिस्तान जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई करणार !

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताच्या विरोधात गेली ३ दशके जिहादी आतंकवादी कारवाया घडवणार्‍या पाकिस्तानने त्याच्या देशातील आतंकवाद्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन ऑलआऊट’ चालू करण्याची घोषणा केली. या कारवाईत बंदी घालण्यात आलेल्या आतंकवादी संघटनांवर कारवाई करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. ही बैठक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही कारवाई नव्या जोमाने आणि निर्धाराने केली जाईल. यात जनतेलाही ससमवेत घेतले जाणार आहे.

पाकिस्तानमध्ये जिहादी आतंकवादी आक्रमणांत वाढ झाली आहे. तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) संघटनेने खैबर-पख्तूनख्वामध्ये आक्रमणे चालू केली आहेत. येथेे गेल्या ३ मासांमध्ये आतंकवादी आक्रमणांमध्ये १२७ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

संपादकीय भूमिका

  • जिहादी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्‍या पाकने अशा प्रकारची कारवाई करण्याला प्रारंभ करणे, याला विनोदच म्हणावा लागेल !
  • पाकला खरेच कारवाई करायची असेल, तर त्याने प्रथम भारतात कारवाया करणार्‍या आतंकवादी संघटनांच्या आतंकवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे बंद करावीत, त्या संघटनांच्या प्रमुखांना भारताच्या कह्यात द्यावे, तसेच त्या आतंकवादी संघटनांवर बंदी घालावी. तरच पाक खरेच गंभीर आहे, असे म्हणता येईल !