रायगडी शिवचंद्राचा अस्त !

आज ६ एप्रिल या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

छत्रपती शिवाजी महाराज

चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी देहत्याग केला.

राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवरायांनी रघुनाथपंत हणमंते यांच्या सूचनेवरून कर्नाटकाच्या स्वारीचा बेत केला. प्रथम त्यांनी गोवळकोंड्याच्या सुलतानाकडून खंडणी वसूल केली आणि मद्रासपर्यंतचा कर्नाटक प्रांत जिंकला. बंधू एकोजी यांच्याकडे तंजावरचे राज्य सोपवून छत्रपती शिवराय रायगडावर परत आले. काही अंतर्गत कलहामुळे महाराज अप्रसन्न होते. पौष शुक्ल ९ या दिवशी त्यांनी सज्जनगडावर जाऊन समर्थ रामदासस्वामींची भेट घेतली. ‘अनेक प्रकारच्या गोष्टी होऊन महाराज परमधामास जाणार’, हे समर्थांनी सुचवले. छत्रपती शिवरायांनी तेथे ३ दिवस ध्यान केले. त्यानंतर महाराज रायगडावर आल्यावर थोड्याच दिवसांत त्यांना ज्वराची व्यथा झाली, आयुष्याची मर्यादा झाली, असे कळून चुकले. महाराजांनी भागीरथीचे उदक प्राशन केले. चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या तिथीला शिवचंद्राचा अस्त झाला. छत्रपती शिवरायांची योग्यता रामचंद्र नीलकंठ अमात्य यांनी ‘राजनीती’कार अशी वर्णित केली.

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्हाद नरहर जोशी)


‘आपली भूमी, राष्ट्र आणि धर्म यांवर आतंकवादी चालून येत असेल, तर त्याचा कोथळाच बाहेर काढावा, असा आदर्श आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला आहे.’ – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती.