श्रीकृष्णजन्मभूमीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश न्यायालयाकडून स्थगित

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील न्यायालयाने श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भात यापूर्वी दिलेल्या आधीचा आदेश स्थगित केला आहे. न्यायालयाने या भूमीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. त्याला ईदगाह पक्षाकडून विरोध करण्यात आला होता. त्यावर निर्णय देतांना न्यायालयाने ही स्थगिती दिली आहे. यावर आता ११ एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.