‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. सानिध्या स्वस्तिक सावंत उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची पातळी ५६ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२७.२.२०२३) |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. सानिध्या स्वस्तिक सावंत ही या पिढीतील एक आहे !
१. चांगली आकलनक्षमता
‘सानिध्याचे पाठांतर चांगले आहे. तिने कठीण श्लोक मुखोद्गत केले आहेत. तिची शालेय शिक्षणातील प्रगतीही चांगली आहे. तिला थोडासा अभ्यास करूनही चांगले गुण मिळतात.
२. समंजस
ती जशी मोठी होत गेली, तसा तिच्यातील समंजसपणा वाढत गेला.
३. मिळून मिसळून रहाणे
सानिध्या लहानपणासूनच इतरांमध्ये मिळून मिसळून रहाते. तिला ‘समवेत आई-वडील हवेत’, असे काही नाही. ती कुणाही नातेवाईकाकडे रहाते. तिला तिच्या नावाप्रमाणेच सगळ्यांच्या ‘सान्निध्या’त रहायला आवडते.
४. सेवेची आवड
तिला तिच्या आजीच्या समवेत वाचकांना साप्ताहिक आणि मासिक ‘सनातन प्रभात’चे अंक द्यायला आवडत असे. तिला मुंबईतील सेवाकेंद्रात जायला आवडत असे. ती तिथे बसून नामजप करत तिच्या क्षमतेनुसार सेवा करत असे. सद्गुरु अनुराधा वाडेकर सानिध्याला ओळखतात आणि त्या दोघींची भेट झाल्यावर तिच्याकडून नामजप करून घेतात.
५. रामनाथी आश्रमाप्रती भाव असणे
एकदा आम्ही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तिथे सानिध्याला सेवा करतांना आनंद मिळत होता. तेथील संतांचा सत्संग लाभल्यावर तिची पुष्कळ भावजागृती झाली. तिला रामनाथी आश्रमातून घरी जायची इच्छा होत नव्हती. तिला ‘आश्रमात राहून गुरुसेवा करावी’, असे वाटत होते.
६. स्वभावदोष
आपले तेच खरे करणे, आळस आणि राग.’
– सौ. सदिच्छा सावंत (कु. सानिध्याची आई), कलमठ, कणकवली, जि. सिंधुदुर्ग. (२५.५.२०२२)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |