(म्हणे) ‘राहुल गांधी प्रकरणावर न्यायालय मूलभूत आणि लोकशाही तत्त्व लक्षात घेऊन सुनावणी करील !’- जर्मनी

राहुल गांधी प्रकरणी जर्मनीनेही व्यक्त केली भूमिका !

राहुल गांधी (डावीकडे) जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या (उजवीकडे)

बर्लिन (जर्मनी) – राहुल गांधी यांच्या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे झाली पाहिजे. न्यायालय गांधी यांच्या सदस्यत्व रहित होण्याच्या प्रकरणाची सुनावणी मूलभूत आणि लोकशाही तत्त्व लक्षात घेऊन करेल, अशी अपेक्षा आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरच गांधी यांचे संसदेतून झालेले निलंबन योग्य आहे कि अयोग्य हे स्पष्ट होईल, असे मत जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या महिला प्रवक्त्याने व्यक्त केले आहे.

यापूर्वी अमेरिकेनेही या प्रकरणी तिचे लक्ष असल्याचे म्हटले होते.

संपादकीय भूमिका

भारताच्या अंतर्गत प्रकरणात नाक खुपसण्याची जर्मनीला काय आवश्यकता आहे ? भारताने याविषयी जर्मनीला खडसावणे आवश्यक आहे !