इंदूर (मध्यप्रदेश) येथे विहिंपच्या पदाधिकार्‍याला शिरच्छेद करण्याची मुसलमानांची धमकी !

विश्‍व हिंदु परिषदेचे धर्मप्रसाराचे प्रांत संयोजक संतोष शर्मा

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील विश्‍व हिंदु परिषदेचे धर्मप्रसाराचे प्रांत संयोजक संतोष शर्मा यांना शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. हिरव्या रंगाच्या पाकिटातून पाठवण्यात आलेल्या पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. ‘मुसलमानांच्या विरोधात कोणतेही काम करू नका’, असे यात म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

इंदूरमध्ये यापूर्वी बजरंग दलाचे पदाधिकारी तन्नू शर्मा, अधिवक्ता अनिल नायडू आणि अधिवक्ता मनीष गडकर यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी नंतर पोलिसांनी काही जणांना अटकही केली होती.

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदु संघटनांच्या पदाधिकार्‍यांना अशा धमक्या देण्याचे कुणाचेही धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !