उत्तरप्रदेशात धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार

बदायू (उत्तरप्रदेश) – येथे ४ धर्मांध तरुणांनी एका हिंदु अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीचे अपहरण करण्यापूर्वी आरोपींनी तिच्या आईला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी इसरार, आरिफ आणि तस्लीम या तिघांना अटक केली आहे, तर चौथा आरोपी अरबाज फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बदायू जिल्ह्यातील बिसोली येथील एका गावामध्ये रहाणारी अल्पवयीन पीडित मुलगी तिच्या आईसमवेत बाहेर गेली होती. आरोपी इसरार, आरिफ आणि तस्लीम आणि अबरार त्यांच्या मागे लागले. गावातील शेतात पोचताच चौघांनी मुलीचा विनयभंग केला. यास तिच्या आईने विरोध केला असता तिला बेदम मारहाण करून बेशुद्ध केले. आरोपींनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कुटुबियांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी गावकर्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना पोलिसांच्या कह्यात दिले. अरबाज अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका 

वासनांध धर्मांध !