युक्रेन युद्धावरून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाकडून पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – युक्रेन युद्धासाठी उत्तरदायी ठरवण्यात आल्याच्या आरोपावरून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने (‘आय.सी.सी.’ने) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे. या अटक वॉरंटवर रशियाने उत्तर दिलेले नाही. पुतिन या वॉरंटला महत्त्व देण्याची शक्यता अल्प आहे; कारण ते युद्धाच्या पहिल्या दिवसापासून युक्रेनला धडा शिकवण्याची धमकी देत आहेत.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग रशियाला जाणार !

शी जिनपिंग

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग २० ते २२ मार्च या कालावधीत रशियाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. युद्ध समाप्त करण्यासाठी जिनपिंग हे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये शांतता चर्चा घडवून आणणार आहेत.