देहली येथे सद्दाम हुसेन याच्याकडून अपंग तरुणीवर बलात्कार !

देहली – येथील मौजपूर परिसरात एका २२ वर्षीय अपंग तरुणीवर ३० वर्षीय सद्दाम हुसेन नावाच्या तरुणाने बलात्कार केला. या प्रकरणी सद्दाम हुसेन याला उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरी येथून अटक करण्यात आली. हुसेन हा बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील रहिवासी आहे. या प्रकरणी तरुणीची वैद्यकीय पडताळणी करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे निश्‍चित झाले. ही तरुणी मौजपूर येथे तिच्या पालकांसमवेत रहाते. ९ मार्च या दिवशी ही तरुणी तिच्या घरात एकटीच होती. त्या वेळी सद्दाम याने तिला स्वतःच्या घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला.

संपादकीय भूमिका

सरकारने अशा वासनांधांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे !