फलटण (सातारा) येथे ३ गोवंशियांची अवैध वाहतूक, वाहनचालकाच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंद !

फलटण (जिल्‍हा सातारा) – येथे गोवंशियांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे, हे वृत्त गोरक्षक निखिल दरेकर यांना मिळाली होती. त्‍यानुसार श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे धारकरी गोरक्षक अक्षय क्षीरसागर, आदित्‍य गायकवाड, प्रसन्‍न गायकवाड, महेश पवार हे रावडी रोड येथे गेले असता त्‍यांना कत्तल करण्‍याच्‍या उद्देशाने दाटीवाटीने कोंबलेल्‍या अवस्‍थेत टेंपोमध्‍ये एकूण ३ बैल आढळले. या प्रकरणी वाहनचालकाच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका

प्रत्‍येक ठिकाणीच गोवंशीय असुरक्षित असणे, हे चिंताजनक !