भारत जी-२०चा अध्यक्ष म्हणून आशादायक प्रारंभ करत आहे ! – अमेरिका  

प्रतिकात्मक छायाचित्र

वाशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने भारताचे जी-२० देशांच्या बैठकीवरून कौतुक केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नेड प्राइस पत्रकार परिषदेत म्हणाले की, आजपर्यंत भारताने जी-२० चे नेतृत्व केले आहे, त्यासाठी आम्ही आमच्या भारतीय भागीदारांचे आभारी आहोत. भारत जी-२० देशांचा अध्यक्ष या नात्याने एक चांगला आणि आशादायक प्रारंभ करत आहे.