बंगालमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक

नवी देहली – भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री निसिथ प्रमाणिक यांच्या वाहनांच्या ताफ्यावर बंगालमध्ये दगडफेक करण्यात आली. या वेळी पोलिसांकडून दगडफेक करणार्‍यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. ही दगडफेक तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी केल्याचा आरोप मंत्री निसिथ प्रामाणिक यांनी केला आहे. ते म्हणाले की, राज्यात जर एक मंत्री सुरक्षित नाही, तर सामान्य नागरिकाच्या स्थितीची कल्पना करता येईल. ही घटना बंगालमधील लोकशाहीची स्थिती दर्शवते.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाच्या गोळीबारात एका आदिवासी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. निसिथ प्रामाणिक या मंत्रालयाचे मंत्री असल्याने नागरिकांनी या रागातून त्यांच्या वाहनताफ्यावर आक्रमण केले.

संपादकीय भूमिका

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे गेल्या काही वर्षांपासून निघत असतांनाही तेथे राष्ट्रपती राजवट का लावली जात नाही ? असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे !