शिखांविषयी प्रेम वाटणार्‍या मुसलमानांनी अमृतसरला चालते व्हावे !

पाकिस्तानमधील मौलानाचे विखारी फुत्कार !

इस्लामाबाद – ज्यांना शिखांविषयी प्रेम वाटते, त्यांनी अमृतसरला चालते व्हावे, असे विखारी फुत्कार पाकिस्तानमधील मौलाना(मौलाना म्हणजे इस्लामचे अभ्यासक)  याने मुसलमानांना उद्देशून बोलतांना काढले. ‘पाकिस्तान अनटोल्ड (अकथित)’ नावाच्या ट्विटर खात्यावर याविषयीचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यात त्याने ‘पाकिस्तान हा काही शिखांचे विद्यापीठ सिद्ध करण्यासाठी निर्माण झालेला नाही’, असेही विधान केले.

(म्हणे) ‘इस्लाम न स्वीकारणारे गुरुनानक हे चांगले असू शकत नाहीत !’

गुरुनानक देव

अन्य एका व्हिडिओत हाच मौलाना म्हणतो की, काही लोकांचे म्हणणे आहे, की, गुरुनानक बाबा यांचे बाबा फरीद उपाख्य शेख फरीद यांच्यावर फार प्रेम होते. माझे म्हणणे आहे की, ‘इतकेच प्रेम आहे, तर अल्लाच्या ‘कलमा’चे पठण का केले नाही ? इस्लाम न स्वीकारणारे गुरुनानक देव हे चांगले असू शकत नाहीत.

संपादकीय भूमिका

याविषयी खलिस्तानवादी गप्प का ?