दोन मुसलमानांना जिवंत जाळल्याचे प्रकरण
नूह (हरियाणा) – हरियाणाच्या भिवानी येथे दोन मुसलमान तरुणांना चारचाकी गाडीमध्ये जिवंत जाळल्याच्या प्रकरणातील कथित आरोपी श्रीकांतच्या घरी जाऊन राजस्थान पोलिसांनी त्याच्या गर्भवती पत्नीला अमानुष मारहाण केली. यामुळे तिच्या गर्भातील मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप श्रीकांतच्या आईने केला आहे. या प्रकरणी अद्याप राजस्थान पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. श्रीकांत यांच्या आईच्या आरोपावरून नूह पोलिसांनी राजस्थान पोलिसांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात येत आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हरियाणा में राजस्थान पुलिस पर बर्बरता का आरोप..
गौरक्षक की गर्भवती पत्नी को राजस्थान पुलिस ने पीटा…..
गर्भ में पल रहे बच्चे की हत्या का जिम्मेदार कौन ?
किसके इशारे पर पुलिस ने की ये अवैध कार्रवाई ?@AmitShah @ashokgehlot51 @PoliceRajasthan @police_haryana pic.twitter.com/vAPXDHHS9W— Sudarshan News (@SudarshanNewsTV) February 19, 2023
श्रीकांतची आई दुलारी यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १६ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजता राजस्थान पोलिसांचे ३०-४० लोक घरी आले. कुटुंबियांना धमकावून त्यांनी बलपूर्वक घराचे दरवाजे उघडले. आत शिरताच श्रीकांतची चौकशी करू लागले. श्रीकांत घरी नसल्याचे त्यांनी राजस्थान पोलिसांना सांगितले. हे ऐकून पोलीस संतापले. त्यांनी घरातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास चालू केले. कुटुंबातील लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मारहाण करण्यास चालू केले. घरातील लोकांना मारहाण करण्यासाठी विविध खोल्यांत घुसू लागले. श्रीकांतची गर्भवती पत्नी कमलेश एका खोलीत होती. राजस्थान पोलिसांनी कमलेश यांना पलंगावरून ढकलून मारहाण केली. यामुळे गर्भवती कमलेश यांच्या पोटात दुखू लागले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेले, तरी त्यांची प्रकृती खालावतच राहिली. कमलेश आणि गर्भातील बाळ यांना असलेला धोका पाहून डॉक्टरांनी १८ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रकर्म केले. यात लक्षात आले की, गर्भातील बाळाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जेव्हा श्रीकांत घरी सापडला नाही, तेव्हा राजस्थान पोलीस श्रीकांतच्या विष्णु आणि राहुल या भावांना बलपूर्वक समवेत घेऊन गेले. यानंतर त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.
राजस्थान पोलिसांनी मारहाणीचा आरोप फेटाळला !
या प्रकरणी राजस्थान पोलिसांनी त्यांच्यावरील मारहाणीचा आरोप फेटाळला आहे. भरतपूर येथील पोलीस अधीक्षक शाम सिंह यांनी दावा केला की, पोलीस आरोपी श्रीकांत याच्या घरात गेली नव्हती. तसेच श्रीकांतच्या भावांना चौकशीसाठी नेण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना परत पाठवण्यात आले.
दुसरीकडे नूह (हरियाणा) येथील पोलीस अधीक्षकांनी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. या घटनेच्या प्रकरणी राजस्थान आणि हरियाणा पोलीस समन्वय करून काम करत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक या प्रकरणी चौकशी करत आहेत.
संपादकीय भूमिका
|