भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे !  

प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांची मागणी

प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा

मुंबई – जेव्हा भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले, तेव्हा पाकिस्तान इस्लामी देश घोषित झाला; कारण तेथे सर्वाधिक मुसलमान होते. भारतमध्ये हिंदु सर्वाधिक होते, तर भारताला हिंदु राष्ट्र घोषित करायला हवे होते. ठीक आहे. तेव्हा झाले नाही, आता झाले पाहिजे, अशी मागणी प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांनी एका व्हिडिओद्वारे केली आहे.

व्हिडिओ त्यांनी पुढे म्हटले आहे की, जगामध्ये एकही हिंदु राष्ट्र, हिंदु देश नाही. एकेकाळी नेपाळ होता; पण तो कायम राहिला नाही. त्याला हिंदु देश म्हणू शकत नाहीत. आता भारतात हिंदु राष्ट्राच्या मागणीची लाट आली आहे. आता लोक संघटित होत आहेत. हिंदु राष्ट्रामुळे कुणाला काही अडचण वाटू नये. आता केवळ घोषणा करावी लागेल.