पुनर्रचना आयोगाच्या विरोधातील याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळल्या !

जम्मू-काश्मीरच्या मतदारसंघांची पुनर्रचना !

नवी देहली – जम्मू-काश्मीरमधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेविषयीच्या आयोगाच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या सर्व याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. यामुळे आता या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हाजी अब्दुल गनी खान आणि महंमद अयूब मट्टू यांनी याचिका प्रविष्ट केल्या होत्या.