निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १५३
‘काही वेळेला काही जण दुचाकीवर बसल्या बसल्याच फाटक (गेट) उघडतात किंवा बंद करतात. असे केल्याने शरिराच्या स्नायूंवर चुकीच्या पद्धतीने ताण येतो. नियमित चुकीच्या पद्धतीने एखादी कृती केल्यास शरिराच्या स्नायूंनाही चुकीचे वळण लागते आणि शरिराची संरचना पालटते. कधीतरी अचानक मान, पाठ, कटी (कंबर) किंवा खांदा यांचे दुखणे किंवा लचक भरणे यांना हे कारण ठरू शकते. तसे होऊ नये, यासाठी (कितीही घाई असली, तरी) दुचाकीवरून उतरून फाटक उघडावे किंवा बंद करावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.२.२०२३)
आयुर्वेदाविषयी शंका विचारण्यासाठी लिहा –
[email protected]