रशियाचा पराभव होईल !

ब्रिटनच्या संसदेत झेलेंस्की यांचा दावा

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक व युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमिर झेलेंस्की

लंडन (ब्रिटन) – आम्हाला ठाऊक आहे की, स्वातंत्र्याचा विजय होणार आहे. आम्हाला ठाऊक आहे की, रशियाचा पराभव होईल आणि विजय जगाला पालटून टाकेल, असे विधान युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमिर झेलेंस्की यांनी ब्रिटनच्या संसदेत केले. या वेळी झेलेंस्की यांनी युक्रेनला दिलेल्या साहाय्यासाठी ब्रिटनच्या नागरिकांचे आभार मानले. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर पहिल्यांदाच झेलेंस्की ब्रिटनच्या दौर्‍यावर गेले आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या वेळी म्हणाले की, झेलेंस्की यांच्या ब्रिटनच्या दौर्‍यातून त्यांचे साहस, दृृढ संकल्प आणि लढण्याची शक्ती दिसून येते. वर्ष २०१४ नंतर ब्रिटनने युक्रेनच्या सैनिकांना महत्त्वपूर्ण प्रशिक्षण दिले, त्यामुळे ते त्यांच्या देशाचे रक्षण करू शकले. मला त्यांचा अभिमान आहे. आता आम्ही नौदल आणि वायूदल यांच्या सैनिकांनाही प्रशिक्षण देऊ.