(म्हणे) ‘हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव यांना दिला जातो पाठिंबा !’

कर्नाटकातील काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांचा हिंदुद्वेष !

काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

कलबुर्गी (कर्नाटक) – हिंदुत्व राज्यघटनाविरोधी आहे. हिंदुत्व आणि हिंदु धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी हिंदु धर्माच्या विरोधात नाही. मीही एक हिंदु आहे; पण माझा हिंदुत्व आणि मनुवाद यांना विरोध आहे, असे विधान काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी येथे एका कार्यक्रमात केले. ‘कोणत्याही धर्मात हत्या आणि हिंसा यांचे समर्थन होत नाही; पण हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव या गोष्टींना पाठिंबा दिला जातो’, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले.

सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, माझा हिंदुत्व आणि त्याअनुषंगाने केले जाणारे राजकारण याला विरोध आहे. भारतीय राज्यघटनेनुसार सर्व धर्मांच्या श्रद्धा या समान आहेत.

संपादकीय भूमिका

  • इस्लाममध्ये काय आहे ? आतंकवाद्यांचा धर्म कोणता असतो ? पोर्तुगिजांनी गोव्यामध्ये हिंदूंचे धर्मांतर कशा प्रकारे केले ? काश्मीरमधून हिंदूंना कुणी पलायन करण्यास भाग पाडले ? आदी गोष्टी सिद्धरामय्या सांगू शकतील का ?
  • हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव असता, तर आज बहुसंख्य हिंदू ९ राज्यांत अल्पसंख्यांक झाले नसते ! काश्मीरमधून त्यांना पलायन करावे लागले नसते आणि सिद्धरामय्या यांनाही हे विधान करण्यापूर्वी विचार करावा लागला असता !