हिंदूंच्या मंदिराच्या जागेवर केलेल्या दाव्याला विरोध
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू हिंदु धार्मिक आणि धर्मादाय बंदोबस्त विभाग यांच्या विरोधात येथील चुलाई भागात भारत हिंदू मुन्नानी (हिंदू अग्रेसर) संघटनेकडून निषेध करण्यात आला.
या विभागाने दावा केला आहे की, अरुल्मिगु अंगलामन मंदिराची भूमी त्यांच्या मालकीची आहे. विभागाने चुलाई-थटनकुलम् भागातील रहिवाशांकडून मासिक भाडे म्हणून अधिकची रक्कम मागितली आहे. तसेच भाडे थकवल्यावरून रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली आहे. भाडे न भरल्यास अतिक्रमण केल्याचे ठरवून त्यांना येथून बाहेर काढले जाईल, अशी चेतावणी दिली आहे. या विरोधात भारत हिंदु मुन्नानी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांसह सुमारे २०० लोकांनी सक्रीय सहभाग घेतला. श्री. आर्. जयकुमार, तसेच हिंदु जनजागृती समितीनेही यात सहभाग घेतला होता.
आंदोलनाच्या वेळी भारत हिंदू मुन्नानीचे राज्यप्रमुख श्री. आर्.डी. प्रभु आणि चुलाई-थटनकुलम हाऊस ओनर्स असोसिएशनचे सचिव श्री. सी. बालाजी यांनी त्यांचे विचार मांडले. चुलाई टेक्सटाईल एम्प्लॉईज असोसिएशनचे संस्थापक माथी यांनी पूर्वीची आणि सध्याची सरकारे मंदिराच्या संपत्तीचा कसा गैरवापर करत आहेत आणि धर्मादाय विभाग सामान्य लोकांना त्रास देत आहे, याविषयी माहिती दिली.