पुणे – ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोर्चा काढला जात आहे. त्याचा अर्थ मला माहिती नाही; पण मला त्याचा अर्थ कुणी समजावून सांगितला, तर मी नक्की त्यावर मत मांडेन, तसेच मला ‘लव्ह’चा अर्थ कळतो. ‘जिहाद’चाही अर्थ कळतो; पण ‘लव्ह जिहाद’ काय आहे, याविषयी मला माहिती नाही, असे विधान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कात्रज येथे एका कार्यक्रमासाठी आले असतांना केले. मुंबईत २ मोर्चे काढले जात असून लिंगायत समाजाचा आणि लव्ह जिहाद विरोधात मोर्चा निघत आहे, त्यावर आपले मत व्यक्त करतांना त्यांनी वरील भूमिका मांडली आहे.
संपादकीय भूमिका
खासदार सुप्रिया सुळे यांचे हे विधान म्हणजे ‘वेड पांघरून पेडगावला जाण्याचा’च प्रकार !
‘श्रद्धा वालकर हिच्या देहाचे तुकडे करणारा ‘आफताब’ आणि बुरखा घालत नाही; म्हणून भररस्त्यात रूपाली चंदनशिवे हिचा गळा चिरणारा ‘इक्बाल शेख’ या प्रकरणांमधून ‘लव्ह जिहाद’ स्पष्ट होत आहे. निधी गुप्ता, अंकिता सिंह, निकिता तोमर आदी अनेक हिंदु तरुणी याला बळी पडल्या आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर जगभर लव्ह जिहादचे षड्यंत्र रचले आहे. याची मान्यता शेकडो प्रकरणांत युवकांनी पोलीस ठाण्यांत दिलेली आहे, हे सुप्रिया सुळे यांना ठाऊक नाही का ? तसेच केरळ उच्च न्यायालयाने लव्ह जिहाद असल्याचेही सांगितले आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार देशभरात महाराष्ट्रात महिलांची झालेली सर्वाधिक तस्करीची प्रकरणे यांतून प्रकर्षाने ‘लव्ह जिहाद’चा प्रकार पुढे येत असूनही केवळ अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्यासाठी सुप्रिया सुळे असे वक्तव्य करत आहेत का? असा प्रश्न कुणाच्याही मनात येऊ शकतो.