वारुंजी (जिल्हा सातारा) येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन पार पडले

मार्गदर्शन करतांना सनातन संस्थेच्या साधिका सौ. कांतावती देशमुख आणि उपस्थित महिला

कराड – येथील वारुंजी गावामध्ये मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिला मंडळाच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने सौ. कांतावती देशमुख यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर उपस्थित महिलांना कुलदेवतेच्या उपासनेचे, तसेच श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात आनंद कसा शोधायचा ? यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन वारुंजी येथील सेवानिवृत्त शिक्षिका सौ. विजया मोहिते यांनी केले होते. कार्यक्रमस्थळी सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.