पाकिस्तानमध्ये ३० लाख रुपयांच्या ५ सहस्र कोंबड्यांची चोरी !

इस्लामाबाद – पाकची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असल्यामुळे तेथील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे जगण्यासाठी नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. रावळपिंडी शहरात काही अज्ञातांनी कुक्कुटपालन केंद्रातील ५ सहस्र कोंबड्या चोरल्या. या कोंबड्यांची किंमत ३० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. साधारण १२ लोकांनी या केंद्रात घुसून या कोंबड्या पळवल्याचे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका

आज जगण्यासाठी कोंबड्या चोरणारे उद्या एकमेकांच्या जिवावर उठतील. पाकिस्तानमध्ये येणार्‍या काळात गृहयुद्ध झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !