लंडनमध्ये बीबीसीच्या मुख्यालयाबाहेर भारतीय वंशांच्या हिंदूंकडून विरोध !

बीबीसीच्या हिंदुद्वेषी माहितीपटाचे प्रकरण

लंडन (ब्रिटन) – गुजरात दंगलीच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदू यांचा द्वेष करणार्‍या ‘बीबीसी न्यूज’च्या माहितीपटावरून देश-विदेशात वाद चालू असतांना लंडन येथे भारतीय वंशांच्या हिंदु नागरिकांनी बीबीसीच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यांनी या माहितीपटावर बंदी घालण्याची मागणी केली.

निदर्शने करणार्‍या हिंदूंनी सांगितले की, न्यायालयाने गुजरात दंगलीच्या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांना निर्दोष मुक्त केलेले असतांना अशा प्रकारचा माहितीपट बनवला जातो.

बीबीसी कधी ब्रिटिशांच्या साम्रज्यवादावर माहितीपट बनवील का ? बीबीसीने  गोध्रा येथे जाळून मारलेल्या कारसेवकांंच्या कुटुंबियांच्या मुलाखती का घेतल्या नाहीत ? बीबीसी केवळ पंतप्रधान मोदी आणि भारत यांना अपकीर्त करण्याचाच प्रयत्न करत आहे.