नातेवाइकांना ‘लव्ह जिहाद’चा संशय !
मिरज – धुळे येथून अपहरण झालेली अल्पवयीन शीख तरुणी मिरजेतील ख्वाजा वस्ती येथे आढळली आहे. या तरुणीला फूस लावून पळवून आणण्यात आल्याचे, तसेच हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचे आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी धुळे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट असून मिरज गांधी चौकी पोलिसांनी त्या मुलीला धुळे पोलिसांच्या कह्यात दिले आहे. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
१. धुळे येथील शीख समाजातील अल्पवयीन तरुणी ही मिरजेतील तिच्या मामाकडे आली होती. त्या कालावधीत किराणा दुकानातील एका मुसलमान तरुणासमवेत तिची ओळख झाली आणि पुढे प्रेमप्रकरण वाढत गेले. ही गोष्ट तिच्या मामाला समल्यावर तिला धुळे येथे पाठवण्यात आले.
२. संबंधित तरुणी धुळे येथे गेल्यानंतर तेथून ती १५ दिवसांत गायब झाली. याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी धुळे पोलिसांकडे दिली. पोलिसांनी अधिक अन्वेषण केले असता ही युवती भ्रमणभाषच्या ‘लोकेशन’वरून मिरज येथे असल्याचे आढळून आले. या संदर्भात गांधी चौकी पोलीस ठाण्यातील पोलीस प्रशासनाने पोलिसी खाक्या दाखवताच मुसलमान कुटुंबियांनी संबंधित तरुणीस पोलीस ठाण्यात उपस्थित केले.
३. पोलिसांनी तरुणीस कह्यात घेऊन धुळे पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर मिरजेतील शीख बांधवांनी हा प्रकार हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कानावर घातला आणि या प्रकरणी साहाय्य मागितले.
४. या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांसमोर बोलतांना माजी आमदार श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘तरुणी अल्पवयीन असल्यामुळे धुळे पोलिसांनी या जिहादी तरुणावर ‘पोक्सो’ अंतर्गत कारवाई करावी. या युवतीचा ‘ब्रेन वॉश’ (बुद्धीभेद) करण्यात आला आहे का ? याचे अन्वेषण करावे. फूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन तरुणीचा या जिहादी तरुणाने बनावट जन्म दाखला, तसेच खोटे आधारकार्ड काढले असून याचेही सखोल अन्वेषण करावे आणि पोलिसांनी शीख समाजाला न्याय मिळवून द्यावा.’’
५. या प्रकरणात भाजपचे नेते श्री. मकरंद देशपांडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. विनायक माईणकर, बजरंग दलाचे संयोजक श्री. आकाश जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. राजेश देशमाने, श्री. राजू शिंदे यांनी या शीख कुटुंबाला साहाय्य केले.
संपादकीय भूमिका‘लव्ह जिहाद’ची वाढती प्रकरणे पहाता ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायद्याची आवश्यकता आहे ! |