श्री रामवडेश्वर देवस्थानच्या प्राकारात दुचाकी नेण्यास मनाई केल्यावरून वाद
पर्वरी, २८ जानेवारी (वार्ता.) – पर्वरी येथील श्री रामवडेश्वर देवस्थानच्या प्राकारात दुचाकी नेण्यास मनाई केल्याने धर्मांध सिकंदर महंमद याने श्री रामवडेश्वर देवस्थान समितीचे सचिव श्री. राजेंद्र चोडणकर, सदस्य श्री. विष्णु नाईक आणि श्री. दीपक विर्नाेडकर यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याविषयी श्री रामवडेश्वर देवस्थानच्या वतीने तक्रार प्रविष्ट करण्यात आल्यानंतर पर्वरी पोलिसांनी सिकंदर महंमद याला कह्यात घेतले.
२८ जानेवारी या दिवशी सकाळी ७ वाजता पर्वरी येथील श्री रामवडेश्वर देवस्थानचे सचिव श्री. राजेंद्र चोडणकर आणि सदस्य श्री. विष्णु नाईक हे देवस्थानच्या प्रवेशद्वाराजवळ थांबले होते. या वेळी सिकंदर महंमद त्याच्या मुलासह दुचाकीवर आला आणि मंदिराच्या प्रकारात जाण्यासाठी प्राकाराचे प्रवेशद्वार उघडू लागला. या वेळी सचिव श्री. राजेंद्र चोडणकर यांनी सिकंदर याला ‘दुचाकी देवस्थानच्या प्राकाराच्या बाहेर ठेव’, असे सांगितले. या वेळी सिंकदर सचिव श्री. राजेंद्र चोडणकर आणि सदस्य श्री. विष्णु नाईक यांच्याशी भांडू लागला आणि त्यांना शिवीगाळ करू लागला. त्यानंतर तो सिकंदर जवळच रहात असलेल्या भाड्याच्या घरात जाऊन काही मिनिटांतच पुन्हा येऊन सचिव श्री. राजेंद्र चोडणकर आणि सदस्य श्री. विष्णु नाईक यांच्याकडे भांडू लागला. या वेळी तेथून दुचाकीने जाणारे श्री. दीपक विर्नाेडकर यांनी सिकंदर याला ‘अशी दादागिरी का करतो?’ असे विचारले असता सिकंदर श्री. विर्नाेडकर यांच्यावर धावून आला आणि त्याने त्यांच्या थोबाडीत लगावली.
यामुळे श्री. विर्नाेडकर त्यांच्या दुचाकीसह भूमीवर कोसळले. या वेळी सिकंदर याने त्यांना मागे लपवून ठेवलेला १५ इंच लांब सुरा बाहेर काढला आणि तेथे असलेल्या तिघांचीही हत्या करणार असल्याची धमकी दिली. सिकंदर म्हणाला, ‘‘मी मुंबई येथील मोठा गुंड आहे आणि माझे मोठे जाळे आहे.’ या वेळी देवस्थानचे अध्यक्ष श्री. कान्होबा नाईक त्या ठिकाणी आले आणि त्याला ‘तुझी काय अडचण आहे ?’, असे विचारले. या वेळी सिकंदरने श्री. कान्होबा नाईक आणि त्याचे कुटुंबीय यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पर्वरी पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी सिकंदर याला कह्यात घेतले. देवस्थान समितीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सिंकदर याने मंदिराच्या विश्वस्तांना यापूर्वीही अनेक वेळा शिवीगाळ करून भांडण उकरून काढले आहे, तसेच त्याने देवस्थानच्या प्राकारातील एका पवित्र झाडाखाली ठेवलेली हिंदूंच्या देवतांची चित्रेही काढण्यास सांगितले आहे.
संपादकीय भूमिका
|