भाजपच्‍या प्रदेश माध्‍यम प्रमुखपदी पत्रकार नवनाथ बन !

नवनाथ बन (मध्‍यभागी) यांचा सत्‍कार करतांना देवेंद्र फडणवीस (डावीकडे) आणि चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, १७ जानेवारी (वार्ता.) – भाजपच्‍या प्रदेश माध्‍यम विभाग प्रमुखपदी पत्रकार नवनाथ बन यांची १६ जानेवारी या दिवशी नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बन यांच्‍या नियुक्‍तीची घोषणा केली. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या उपस्‍थितीत येथे नवनाथ बन यांनी १५ जानेवारी या दिवशी भाजपमध्‍ये प्रवेश केला.

‘गेल्‍या १५ वर्षांपासून बन हे माध्‍यम क्षेत्रात कार्यरत आहेत. दैनिक ‘गावकरी’पासून त्‍यांच्‍या पत्रकारितेतील कारकीर्द चालू झाली. ‘मराठवाडा नेता’ या वृत्तपत्रांत, तसेच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीमध्‍ये त्‍यांनी काम केले. विद्यार्थी दशेत त्‍यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले. बन यांना माध्‍यम क्षेत्राचा मोठा अनुभव असून भाजपची धोरणे आणि विचारधारा सामान्‍य माणसांपर्यंत पोचवण्‍याचे काम ते करतील’, असे प्रदेशाध्‍यक्ष बावनकुळे यांनी सांगितले.