हिंदूंनो, धर्मरक्षणासाठी सिद्ध व्‍हा ।

सद्गुरु राजेंद्र शिंदे

तीळगूळ घ्‍या अन् गोड गोड बोला ना ।
द्रष्‍ट्या संतांचे (टीप) बोलणे जरा शांतपणे ऐका ना ॥ १ ॥

संपत्‍काळ संपूनआपत्‍काळ हा आला ।
निद्रिस्‍तपणा सोडून जागे व्‍हा ना ॥ २ ॥

हिंदुत्‍वाला नष्‍ट करण्‍या सर्व जण सरसावले ।
धर्मरक्षण करण्‍या तुम्‍ही लवकर सिद्ध व्‍हा ना ॥ ३ ॥

किती दिवस षंढपणाने दुसर्‍यांचा मार खाणार ।
स्‍वतःतील क्षात्रतेज वाढवून संघर्ष करण्‍या सिद्ध व्‍हा ना ॥ ४ ॥

तीळगूळ घ्‍या अन् गोड गोड बोला ना ।
द्रष्‍ट्या संतांचे (टीप) बोलणे जरा शांतपणे ऐका ना ॥ ५ ॥

टीप – सच्‍चिदानंद परब्रम्‍ह डॉ. आठवले आणि प.पू. गगनगिरी महाराज इत्‍यादी संत. त्‍यांनी आपत्‍काळाविषयी सांगितले आहे.

इदं न मम ।
॥ श्रीगुरुचरणार्पणमस्‍तु ॥
– (सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल (१५.१.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक