हिंदु धर्मात सांगितलेल्या कृती करण्यास ख्रिस्ती (कॉव्हेट) शाळांतून होणारा विरोध !
‘माझी मोठी मुलगी एका ख्रिस्ती (कॉव्हेट) शाळेत शिकत आहे. मी तिला हिंदु धर्मातील शास्त्राप्रमाणे हातात बांगडी घालण्यास सांगते. त्याप्रमाणे ती प्रतिदिन शाळेत जातांना एका हातात घड्याळ आणि दुसर्या हातात मेटलची बांगडी घालून जाते. एकदा तिच्या शाळेत विद्यार्थ्यांची तपासणी झाली. त्या वेळी तिच्या हातात बांगडी होती. ती काढून घेतली आणि जप्त केली. या प्रसंगाला एक वर्ष झाले. ती बांगडी अनेकदा मागूनही शाळेने परत दिलेली नाही.’
– एक साधिका