कांचीपूरम् (तमिळनाडू) येथे मित्रासमोरच विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार !

पाचही  आरोपींना अटक

कांचीपूरम् (तमिळनाडू) – येथील बेंगळुरू-पुद्दुचेरी महामार्गाजवळ एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला. विमल, मणिकंदन, शिवकुमार, विघ्नेश आणि थेनरसू अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. पीडित मुलगी आणि तिचा मित्र एका खासगी शाळेजवळ उभे राहून बोलत असतांना आरोपींनी त्यांना घेरले, तसेच चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी मित्रासमोरच पीडितेवर बलात्कार केला.

संपादकीय भूमिका

  • तमिळनाडूतील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा ! दिवसाढवळ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार होतो, हे पोलिसांना लज्जास्पद !
  • अशांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी तमिळनाडू सरकारने आता प्रयत्न केला पाहिजे !