सामाजिक माध्यमांतून अल्लाला ‘क्रूर’ म्हटल्याने हिंदु मुलाला अटक !

कराची (पाकिस्तान) – सामाजिक माध्यमांतून अल्लाचा कथितरित्या अवमान केल्याच्या प्रकरणी पाकच्या सिंध प्रांतात लवकुमार या हिंदु मुलाला अटक करण्यात आली  त्याने हिंदु मुलींचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर केले जात असल्याची टीका केली होती.

लवकुमार याने उर्दू भाषेमध्ये प्रसारित केलेल्या मजकुरात म्हटले होते, ‘ओ मौला (अल्ला), निर्णय घेतांना तू इतका क्रूर कसा होऊ शकतो ?’ या मजकुरावरून स्थानिक पोलिसांनी या मुलाला त्याच्या कुटुंबियांना न सांगताच अटक केली. २२ नोव्हेंबर या दिवशी तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर २७ डिसेंबरला समोर आले की, तो कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे.

संपादकीय भूमिका

भारतात मुसलमानांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे, देवतांच्या मूर्तींची तोडफोड, देवतांचा अवमान, चोर्‍या आदी कृत्य केले जात असतांना त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई  होत नाही; मात्र पाकमध्ये हिंदूंना खोट्या प्रकरणांत अटक केली जाते, हे लक्षात घ्या !