सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्‍या नामजपादी उपायांनी तीव्र गुडघेदुखी न्‍यून होणे

(पू.) सौ. उमा रविचंद्रन्

‘ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये माझ्‍या डाव्‍या पायाच्‍या गुडघ्‍यात पुष्‍कळ वेदना होऊन त्‍याला सूज आली. मी आधुनिक वैद्यांकडे गेल्‍यावर त्‍यांनी मला काही औषधे दिली. त्‍यानंतर मी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍याशी मला होत असलेल्‍या गुडघेदुखीविषयी बोलले. त्‍यांनी मला गुडघेदुखी थांबण्‍यासाठी नामजपादी उपाय दिले. मी ते उपाय नियमितपणे करू लागले. नंतर मी माझ्‍या गुडघ्‍यांची ‘क्ष किरण (एक्‍स् रे)’ तपासणी करून घेतली आणि अस्‍थीरोग तज्ञांचा समुपदेश घेतला. त्‍यांनी माझ्‍या वयाच्‍या महिलांमध्‍ये नेहमी आढळणारा संधीवात असण्‍याची शक्‍यता सांगितली. वैद्यांनी मला व्‍यायाम करायलाही सांगितला.

सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी दिलेले उपाय करतांना मला माझ्‍या देहात पुष्‍कळ चैतन्‍य प्रवाहित होत असून मला आध्‍यात्मिक स्‍तरावरील लाभ होत असल्‍याचे जाणवले. जेव्‍हा मला गुडघेदुखीचा त्रास चालू झाला, तेव्‍हा मला खाली बसता येत नव्‍हते, पायर्‍या चढता येत नव्‍हत्‍या, तसेच त्‍या वेळी मला पुष्‍कळ वेदनाही होत असत. औषधांच्‍या समवेत मी सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी दिलेले उपाय केल्‍याने मला आता पूर्णतः बरे वाटत आहे. आता मला खाली बसतांना अथवा पायर्‍या चढतांना जराही वेदना होत नाहीत. अमेरिकेला जातांना मी विमानात २० घंट्यांहून अधिक वेळ बसून प्रवास करू शकले आणि त्‍या वेळीही मला वेदना झाल्‍या नाहीत.

परात्‍पर गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या) आणि सद़्‍गुरु गाडगीळकाका यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (पू.) सौ. उमा रवीचंद्रन्, चेन्‍नई (२२.१२.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक