धर्म पालटून लग्न केले नाही, तर समाजात तोंड दाखवू शकणार नाही, अशी स्थिती करू ! – मध्यप्रदेशातील हिंदु युवतींना धर्मांधांच्या धमक्या

महू (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील महू येथे अल्पवयीन हिंदु युवतींना लग्नासाठी आणि धर्मांतरासाठी धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. वाहिद आणि अमन या मुसलमान तरुणांनी हिंदु युवतींना धर्मांतर करून लग्न करण्यासाठी धमकावले. तसेच पीडित युवतींच्या समवेत अश्लील कृत्य केले, असा आरोप पीडित युवतींनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. लग्नास नकार दिल्यावर ‘हिंदु समाजात तुमची किंमत नाही, आमच्याशी लग्न करा आणि मुसलमान व्हा. धर्म पालटून लग्न केले नाही, तर समाजात तोंड दाखवू शकणार नाही, अशी स्थिती करू’, अशी धमकी या दोन्ही धर्मांधांनी दिल्याचे पीडित मुलींनी म्हटले आहे.

महू पोलिसांनी ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेणे चालू केले आहे. यापूर्वी मध्यप्रदेशातील भोपाळमधून ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी आरोपी फैजल सय्यद अब्बास नावाच्या व्यक्तीने शान पंडित असल्याचे भासवून हिंदु अल्पवयीन मुलीला फसवले. आरोपीने तिच्यावर बलात्कार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडले होते.

संपादकीय भूमिका

प्रसंगी प्रेमाच्या नावाखाली फसवून, तर कधी धर्मांतरासाठी दमदाटी करून हिंदू युवतींवर अत्याचार करणारे जिहादी मुसलमान !